
पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सिल्लोड
पुर्णा अर्बन सिल्लोड या संस्थेची स्थापना श्री विश्वासराव बाबुराव गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१६/१२/१९९९ रोजी नोंदणी केली व गेल्या २५ वर्षापूर्वी बोरगाव बाजार या छोट्याशा गावात दिनांक ०७/०१/२००० ला सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेचे कार्यक्षेत्र बोरगाव बाजार, बोरगाव सारवाणी, कोटनांद्रा या तीन गावापुरते मर्यादित होते, संस्था स्थापने पासून सतत नफ्यात असून" अ" वर्गात आहे.
बघता बघता पूर्णा अर्बनचा विस्तार विश्वास, पारदर्शकता, तंत्रज्ञान या त्रिसूत्री मुळे वाढतच गेला, संस्थेचा व्यवसाय वृंदीगत व्हावा यासाठी संस्थेने फेब्रुवारी २०१२ मध्ये तालुका कार्यक्षेत्राला मंजुरी मिळविली, बोरगाव बाजार परिसरातील सभासदां पाठोपाठ तालुक्यातील सभासदांना सेवा पुरविता यावी यासाठी शाखा विस्तार करून २०१६ मध्ये सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, भराडी, सिल्लोड या शाखा सुरु करण्यात आल्या. सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदारांच्या सहकार्याने संस्थेने सन २०२० मध्ये जिल्हा कार्यक्षेत्रास मंजुरी मिळविली. बघता बघता बोरगाव बाजार पासून सुरू झालेल्या या संस्थेच्या आता संभाजीनगर सह जिल्ह्यात १० शाखा कार्यरत आहेत, संस्थेने कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड च्या आवारातील गट क्र. ८१/१ मधील २९५३ (१५३७ स्क्वेर फुट) इमारत २९ वर्षाच्या कराराने भाडेतत्वावर घेण्यात आली आहे, येथे संस्थेचे मुख्यकार्यालय कार्यरत असून येथून सर्व शाखांचे व्यवहार केले जातात, संस्थेच्या सिल्लोड तालुक्यात १) बोरगाव बाजार, २) आमठाणा, ३) भराडी, ४) सिल्लोड, ५) शिवना, ६) मार्केट यार्ड सिल्लोड तर कन्नड तालुक्यात १) नाचनवेल, २) चिंचोली लिंबाजी ३) पिशोर व संभाजीनगर येथे टी.व्ही. सेंटर शाखा सभासदांचे सेवेत सुरु आहे, तसेच संस्थेची ११ वी शाखा गोळेगाव येथे लवकरच सुरू होत आहे.
संस्थेने आपल्या शेतकरी सभासदांच्या शेतीमालास योग्यभाव मिळावा या उद्देशाने माल साठवून ठेवण्याकरिता बोरगाव बाजार परिसरात भराडी, बोरगाव बाजार, आमठाणा, चिंचोली लिंबाजी, पिशोर व नाचनवेल या शाखांच्या मध्यभागी व सोयीस्कर अशा ठिकाणी संस्थेच्या मालकीच्या सहा एकर जमिनीवर १० हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोडावून व कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून देणार असून शेतीव्यवसायास चालना देण्याचे काम संस्था करणार आहे तसेच मालसाठवून ठेवल्याने आर्थिक अडचण आल्यास त्या शेतकऱ्यांना माल तारण कर्ज त्वरित उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमालास योग्य भाव मिळवून देवून त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
दृष्टीकोन आणि उद्दिष्ट
दृष्टीकोन
ग्राहकांसाठी सहज, वेगवान आणि उच्च दर्जाच्या बँकिंग सेवा उपलब्ध करून देत, संपूर्ण महाराष्ट्रात शाखांचे विस्तारीकरण करणे.
- शाखांचा विस्तार
- उत्तम सेवा
- विश्वासार्हता

उद्दिष्ट
सर्वसामान्य लोकांना आर्थिक सक्षमता देण्यासाठी उत्तम वित्तीय सेवा प्रदान करणे, पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सतत नाविन्याच्या माध्यमातून सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे.
- आर्थिक समृद्धी
- सुविधाजनक व्यवहार.
- सुरक्षितता आणि गोपनीयता
- ग्राहक समाधान


संस्थापकांचे मनोगत
श्री. विश्वासराव गाढे
आर्थिक स्थैर्यातून सर्वांगीण विकास संस्थेच्या १० शाखांमधून हजारो सभासदांना बचत संस्कृती जोपासण्यापासून ते योग्य गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करण्यापर्यंत बँकेची मोठी भूमिका आहे. बँकेने वेळोवेळी नाविन्यपूर्ण ठेवी योजना, कर्ज योजना आणि डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध करून ग्राहकांना आधुनिक आर्थिक सेवांचा लाभ दिला आहे.
विश्वास, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा महामार्ग बँकेच्या स्थापनेपासूनच विश्वास, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान या त्रिसूत्रीवर तिचा विस्तार होत राहिला आहे. हजारो लघु उद्योजक, शेतकरी, व्यावसायिक आणि ग्राहकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पूर्णा अर्बनने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
माझा विश्वास आहे की, भविष्यातही पूर्णा अर्बन बँकेच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख सेवा अधिक सक्षम होतील आणि नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतील. बँकेच्या यशामागे सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. तुमची साथ हेच आमचे बळ आहे.
धन्यवाद! श्री. विश्वासराव गाढे (संस्थापक, पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सिल्लोड)
शाखा
कोटींचा व्यवसाय
सभासद
तास अविरत सेवा


मला बचत करायची होती.मी माझी बचत पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि मध्ये ठेवायला सुरूवात केली. मला माझ्या बचतीवर आकर्षक व्याजही मिळायला लागले. त्यामुळे माझे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पुर्णा अर्बन कडे तुमची गुंतवणूक एकदम सुरक्षित राहते. त्यामुळे तुम्हीही येथे खाते उघडा आणि आकर्षक योजनांचा लाभ घ्या.


मला व्यवसाय सुरू करण्यासाठी विश्वासार्ह ठिकाणाहून भांडवलाची गरज होती. त्याच दरम्यान, मला पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. बद्दल माहिती मिळाली. मी तात्काळ अर्ज केला आणि सहज कर्ज मिळवले. आज त्यांच्या मदतीने माझा व्यवसाय यशस्वीपणे सुरू आहे आणि माझे भविष्यही सुरक्षित झाले आहे.


वैयक्तिक अडचणी कधीही सांगून येत नाहीत, तसेच माझ्याबाबतीतही झाले. अचानक मोठी अडचण आली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला वैयक्तिक कर्जाची गरज भासली. मात्र, ते सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाणाहून घ्यावे, हाच माझा विचार होता. अशा कठीण प्रसंगी पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांच्या 'वैयक्तिक कर्ज योजना' मदतीला आली. या योजनेमुळे मला तात्काळ कर्ज मिळाले आणि माझ्या अडचणी सोडविण्यासाठी मोठा आधार मिळाला. त्यामुळे आज मी निश्चिंत आणि निर्धास्त आहे.


पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांच्या मोबाईल बँकिंग सुविधेमुळे माझे आर्थिक व्यवहार आता अधिक जलद आणि सोपे झाले आहेत. मोबाईलद्वारे पैसे पाठवणे-स्वीकारणे, बिल भरणे आणि खात्यातील शिल्लक तपासणे यांसारख्या सेवा मी सहज वापरू शकतो/शकते. यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. शिवाय, सुरक्षित आणि खात्रीशीर माहिती मिळते, त्यामुळे येथे खाते उघडल्याचा मला अत्यंत आनंद वाटतो.

QR कोड वापरूया, प्रगतीकडे वाटचाल करूया.
अधिक माहितीसाठी आपली विश्वसनीय शाखा ‘पुर्णा अर्बन’ला भेट द्या किंवा कॉल
करा.
सर्वोत्तम व सुरक्षित बँकिग सेवेचा लाभ घ्या.
