व्यवसाय कर्ज
नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय करण्याला आजकाल अनेक लोकं प्राधान्य देत आहेत. पण त्यांच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न असतो तो भांडवलाचा. भांडवलासाठी घरचे आर्थिक मदत करतात. पण बाहेरून कुणाकडून आर्थिक मदत मिळणे कठीण असते. अनेकदा ते सुरक्षितही नसते. अशावेळी तुम्हाला सुरक्षित मदत मिळेल ती पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या 'व्यवसाय कर्ज' योजनेची. एकतर तुमच्यासाठी सुरक्षित जागेतून भांडवल उभं राहील. शिवाय तुम्ही तात्काळ कर्ज मिळवून तुमचा व्यवसाय लवकरात लवकर सुरूही करू शकाल. व्यवसाय छोटा असो वा मोठा स्वप्न मोठे बघावे. आणि त्यासाठी कायम मदतीला आहे पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. तुमच्या व्यवसायासाठी आणि काही कालावधीसाठी पैशांची गरज असेल तर व्यावसायिक कर्जासाठी काय करायला हवे याबाबात अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.


सोने तारण कर्ज
अचानक पैशांची गरज लागली तर काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न पडतो. अशावेळी गरजेला येऊ शकते ते तुमचेच सोने. तुमचेच सोन्याचे दागिने तुम्हाला पैसे मिळवून देतील. यासाठी मदतीला धावून येईल ती पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची 'सोने तारण कर्ज' योजना. तेथे तुम्ही अत्यंत सुरक्षितपणे सोने तारण ठेवू शकता आणि गरजेप्रमाणे पैसे उभे करू शकता. शेवटी मदतीला कायम आपलीच माणसं उभी राहतात. पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. च्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.
मुदत ठेव कर्ज
पैशांची गुंतवणूक करणे नेहमीच फायद्याचे असते. तुम्ही पैसे गुंतवता तेव्हा तुम्हाला त्यापासून व्याज मिळू शकते. तसेच कर्जही मिळू शकते. हे सगळं शक्य होऊ शकतं पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मध्ये गुंतवणूक केल्यावर. तुम्ही एकच करायचे, मुदत ठेव योजनेत सुरक्षित पैसे गुंतवायचे व आकर्षक व्याजदर मिळवायचे. यात कर्जाच्या कालावधीत तुम्हाला तुमच्या ठेवींवर व्याज मिळते आणि असलेल्या ठेवीवर लगेच कर्जही मिळू शकते. म्हणजेच एकप्रकारे तुम्ही केलेली बचत सुरक्षित राहतेच शिवाय तुमची पैशांची गरजही पूर्ण होते.शिवाय सुरक्षेची हमीही मिळते. मुदत ठेव कर्जाविषयी अधिक माहितीसाठी पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. च्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.


सोने खरेदी कर्ज
हल्ली सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मुला-मुलींच्या लग्नासाठी सोने घेणे महाग झाले आहे. सोन्यात गुंतवणूक करणेही कठीण झाले आहे. सोन्याचे भाव पुढील काळात आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. अशावेळी काय करायचं हा मोठा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर एक मार्ग म्हणजे सोने खरेदी कर्ज योजनेचा लाभ घेणे. पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. च्या सोने खरेदी कर्ज योजनेद्वारे तु्मच्याकडे कमी पैसे असले तरी सोने खरेदी करून ठेवू शकतात. सुरुवातीला विशिष्ट रक्कम भरून सोने खरेदी करायची आणि उरलेले पैसे नंतर हफ्त्यांमध्ये द्यायचे. याबाबात अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.
आवर्त ठेव कर्ज
आपल्या पगाराच्या काही टक्के भाग वेगळा काढून त्याची बचत करणे गरजेचे आहे.ही बचत करण्यासाठी आपण खूप मेहनत करतोच अगदीच वेळ पडली तर एखादं शॉपिंग कमी करतो पण पैसे बाजूला ठेवतो. हे असे करणे भविष्यात आपल्याच फायद्याचे असते. तुमची बचत सुरक्षित राहण्यासाठी ती योग्य जागी गुंतवावी लागते. पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या आवर्त ठेव योजनेत तुम्ही तुमचे पेसे सुरक्षित ठेवू शकता. शिवाय गरज पडली तर त्यांच्याच आवर्त ठेव कर्ज योजनेद्वारे या बचतीवर कर्जही घेऊ शकता. बचतीची शिस्त लावल्याने गरजेला तुम्हाला तुमचेच पैसे वापरता येणार आहेत. याबाबात अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.


वैयक्तिक कर्ज योजना
आजकाल अनेकांना वैयक्तिक आर्थिक अडचणी येतात. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जो तो प्रयत्न करतो. काहीवेळा उधार पैसे घेणे नको वाटते. अशावेळी वैयक्तिक कर्ज / पर्सनल लोन घेणे हा उत्तम उपाय आहे. अशाच अचानक येणाऱ्या अडचणींवर मात करायला मदत करते 'वैयक्तिक कर्ज योजना'. पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मध्ये तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.कमीतकमी कागदपत्रांमध्ये त्वरीत हे कर्ज तुम्हाला मिळू शकते. यामुळे तुमची अडचणही सुटण्यास मदत मिळू शकते. याबाबात अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.
पिग्मी तारण कर्ज
बचत करण्यासाठी अनेकजण छोटी छोटी रक्कम पिग्मी खात्यात साठवत असतात. मात्र हेच पैसे भविष्यात तुमच्या मदतीसाठी धावून येऊ शकतात. पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मधील तुमच्या पिग्मी खात्यात जमा झालेल्या रक्कमेवर तु्म्ही कर्जही काढू शकता. त्यामुळे कधी पैश्यांची गरज भासली तर काळजी करू नका, तुमच्या पिग्मी खात्यावर तुम्हाला त्वरित कर्ज मिळू शकेल आणि तुमची गरजही भागेल. मात्र त्यासाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.


कर्मचारी पगार तारण कर्ज
नोकरदार वर्गाला दर महिन्याला मिळणारा पगार हा फार महत्त्वाचा असतो. त्याच्या दैनंदिन गरजा या पगारावरच भागवल्या जातात. हा पगार आपल्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत करतो. तसेच तो नेहमी गरजेच्या वेळीही धावून येतो. आता तुम्ही पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मधून 'पगार तारण कर्ज योजनेच्या'मदतीने तुमच्या येणाऱ्या पगारावर तत्काळ कर्ज घेऊ शकता आणि वेळेला तुमची गरज भागवू शकता. हे सगळं शक्य कसं होईल हे जाणून घेण्यासाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.
छोट्या व्यवसायासाठी अल्प मुदत कर्ज योजना
व्यवसाय छोटा असो किंवा मोठा...त्यासाठी भांडवलाची आवश्यकता भासतेच. पण काही वेळा अल्प मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते. अश्या समयी तुम्हाला त्वरित कर्ज हवे असेल तर तुमच्या मदतीला येईल ती पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. येथे जलद प्रक्रियेद्वारे अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते. शिवाय सुरक्षेचीही हमी. तुम्हाला थोड्या कालावधीसाठी पैशांची गरज असेल तर अल्प मुदत कर्ज योजनेचा लाभ कसा घेता येईल याच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.


बचत गट कर्ज योजना
महिला मोठ्या प्रमाणावर आपला व्यवसाय सुरू करत आहेत. यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम तर बनतातच पण एक वेगळा ठसाही उमटवितात. या महिलांना व्यवसायात आणखी सक्षम करण्यासाठी, त्यांना भांडवलासाठी मदत मिळावी यासाठी पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ची बचत गट कर्ज योजना आहे. जेथे महिलांना कमीत कमी व्याज दरात तत्काळ कर्ज उपलब्ध होऊ शकते. यामुळे असंख्य महिला बचत गट स्थापन करू शकतात व आपले व्यवसायाचे स्वप्न इतर महिलांच्या साथीने सुरक्षितपणे साकार करू शकतात. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.
मालमत्ता तारण कर्ज योजना
आयुष्यात संकटे कधी सांगून येत नाही. संकट आलं की ती सोडविण्यासाठी पैशांचीही गरज लागते. मोठ्या अडचणी वेळी पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न असतो. अशावेळी पर्याय उरतो तो सुरक्षित ठिकाणी मालमत्ता तारण ठेवण्याचा. पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. च्या मालमत्ता तारण कर्ज योजनेद्वारे तुम्ही तुमची मालमत्ता सुरक्षितपणे त्यांच्याकडे ठेवू शकता. शिवाय त्यावर अल्प व्याजदरात लगेच कर्ज मिळवू शकता. त्यामुळे तुमची समस्या सुटण्यास मोठा हातभार लागू शकतो. या कर्ज योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.


वाहन तारण कर्ज योजना
स्वत:चे वाहन असावे अशी आता प्रत्येकाची इच्छा असते. किंबहुना दैनंदिन आयुष्यासाठी वाहन असणे खूप फायद्याचे ठरते. पण आपल्या पगारात वाहन घेणे काहीना शक्य नसते. अशावेळी तुम्ही पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. वाहन तारण कर्ज योजनेंतर्गत योग्य व्याजदरात वाहन कर्ज घेऊन वाहन खरेदी करू शकता. कमीत कमी व्याजदर व तत्काळ कर्ज मंजुरीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि गाडी घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा.