About
स्मार्ट बँकिंग

QR कोड सुविधा

सध्याचा युग हा डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे, जिथे प्रत्येकजण आपल्या व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करत आहे. अगदी भाजीवाले आणि किराणा दुकानदारसुद्धा आता QR CODE वापरताना दिसतात. रोख व्यवहार करण्यापेक्षा QR CODE द्वारे पेमेंट स्वीकारणे अधिक सोपे आणि सुरक्षित आहे.

हीच गरज ओळखून, पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. द्वारे QR CODE वापरून ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारताना आवश्यक असलेल्या ठराविक रकमेच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमच्या आर्थिक भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या!

स्मार्ट बँकिंग

मोबाईल बँकिंग

पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मधील खातेधारकांचे दैनंदिन व्यवहार अधिक गतिमान आणि कॅशलेस करण्याच्या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

या सुविधेमध्ये मोबाईल अॅपच्या माध्यमातून पैसे पाठवणे-स्वीकारणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इत्यादी सेवा सहज आणि सुरक्षितपणे वापरता येतात. आता व्यवहार करा अधिक सोप्या, जलद आणि सुरक्षित पद्धतीने!

About
About
स्मार्ट बँकिंग

IMPS सुविधा

पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मधील खातेधारकांना पेपरलेस आणि जलद बँकिंग अनुभव मिळावा यासाठी IMPS सेवा उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेमार्फत तुम्हाला चेक क्लिअरन्स, भारतात कुठेही त्वरित पैसे पाठवणे आणि स्वीकारणे यांसारख्या सोयीसुविधा सहज उपलब्ध होतात. आता तुमचे आर्थिक व्यवहार करा अधिक सोपे, सुरक्षित आणि वेगवान!

स्मार्ट बँकिंग

SMS बँकिंग

आता तुमचे सर्व आर्थिक व्यवहार तुमच्या मोबाईलवर सहज आणि सुरक्षितरित्या करता येणार आहेत!

पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. तुम्हाला SMS BANKING सुविधा प्रदान करते, ज्यामुळे पैसे ट्रान्सफर केल्याचे तसेच खात्याशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला थेट एसएमएसद्वारे मिळतील.

About
About
स्मार्ट बँकिंग

RTGS सुविधा

पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि..मधील आरटीजीएस प्रणालीद्वारे तुम्हाला एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी हस्तांतरित करता येऊ शकते. तुम्हाला २ लाखांहून अधिक रकमेचे व्यवहार करता येणे शक्य असते. शिवाय भारतात कुठेही पैसे पाठविण्याची आणि स्विकारण्याची सुविधाही यात उपलब्ध करून दिली आहे.

स्मार्ट बँकिंग

NEFT सुविधा

पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि..मधील खातेधारकांना NEFT या सुविधेद्वारे भारतात कुठेही पैसे पाठविणे आणि स्विकारणे सोपे होते. NEFT द्वारे तुम्ही 2 लाखांपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित करू शकता.

About